Thursday 2 April 2020

वडापाव तयार करणे.

सध्या चटपटीत खाण्याकडे सर्वांचाच कल जास्त वाढत  आहे परंतु या चटपटीत खाण्यामुळे आरोग्य वरती होणारे दुष्परिणाम याकडे कोणाचेच लक्ष नाही . उघड्यावरील पदार्थ खाणे किती हानिकारक आहे हेही सध्या कोणाला समजत सुद्धा नाही . खरंच सर्वजण म्हणतात तेच बरोबर आहे आता सध्या फास्ट फूडचा जमाना आहे. या धावपळीच्या जमान्यात लोकांचा सर्व कल फास्टफूड खाण्याकडेच वळला आहे . पालकां बरोबर मुलांनाही फास्टफूड खाण्यास मिळत आहे. असे बाहेरचे उघड्या वरील  पदार्थ स्वच्छतेबरोबरच आरोग्यदायक असतीलच असे नाही. आपण घरी केलेले पदार्थ स्वच्छ व आरोग्याचा विचार करूनच करत असतो .  असे पदार्थ मुलांना तयार करता आले तर मुलेही  घरी ही पदार्थ तयार करू शकतील . म्हणून शाळेतील मुलांना पण असे पदार्थ खाण्याबरोबरच प्रॅक्टिकल मध्ये तयार करण्यास शिकावे असे वाटते  म्हणून अन्न पदार्थ टिकवण्याच्या विविध पद्धती  या प्रॅक्टिकल अंतर्गत वडापाव तयार करणे हे  प्रॅक्टिकल घेण्याचे  ठरविले.
अपेक्षित कौशल्य :-- 1.बटाटे  पाण्यात  उकडणे
2.वडा बेसन पिठात बुडवून तेलात सोडणे हे कौशल्य प्राप्त झाले .3.वडापाव तळण्याचे कौशल्य प्राप्त झाले.
 एकूण खर्च  290
एकूण  जमा  340.00(34 वडापाव * 10≠= 340)
एकूण नफा  50.00


गणेशउत्सवात श्री गणेश मूर्ती ठेवण्यासाठी पाट तयार करणे.



 शाळा श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ शाळेतील आय .बी. टी.  अभियांत्रिकी विभागातील मुलांनी सुतारकाम या प्रॅक्टिकल मध्ये गणपती बसवण्यासाठी तयार करण्याचे ठरवले यामध्ये मुलांना प्लायवूड कशापासून बनवतात. कटिंग कसे करायचे मोजमाप कसे घ्यायचे गुण्या कसा करायचा असे विविध प्रकारचे कौशल्य मुलांना हाताळण्यास मिळाले यासाठी मटेरियल खर्च 120 रुपये मजुरी 36 रुपये एकूण खर्च 156 रुपये
शाळा श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ शाळेतील आय .बी. टी.  अभियांत्रिकी विभागातील मुलांनी सुतारकाम या प्रॅक्टिकल मध्ये गणपती बसवण्यासाठी तयार करण्याचे ठरवले यामध्ये मुलांना प्लायवूड कशापासून बनवतात. कटिंग कसे करायचे मोजमाप कसे घ्यायचे गुण्या कसा करायचा असे विविध प्रकारचे कौशल्य मुलांना हाताळण्यास मिळाले यासाठी मटेरियल खर्च 120 रुपये मजुरी 36 रुपये एकूण खर्च 156 रुपये

पेपरवेट तयार करणे.



आय बी टी अभियांत्रिकी विभागात थ्रेडिंग व टॅपिंग हे प्रॅक्टिकल करण्यासाठी मुलांनी पेपरवेट बनवण्याचे ठरवले त्यासाठी त्यासाठी लागणारी एम एस पट्टी कट करून घेते त्यावर  सेंटर पंच च्या सहाय्याने मार्किंग करून घेतले व त्यावर ड्रिल पाडले त्यानंतर एम एस पट्टी बेंच व्हाईस मध्ये पकडून त्यावर टॅपिंग केले त्यामध्ये मुलांना टॅपिंग  ड्रिलिंग कटिंग मोजमाप असे विविध कौशल्य मुलांना प्राप्त झाले यामध्ये मटेरियल खर्च 12 रुपये मजूर 3 एकूण खर्च 15 रुपये रुपये.



नानकटाई तयार करणे.



साद्या लोक कामाच्या व्यापात इतके व्यस्त झाले आहेत की जेवनाव्यतिरिक्त लागणारे फास्ट फूड बनवायला त्यांना आता टाइम नाही म्हणून आता जास्त काळ टिकणारे पदार्थ म्हणजेच बेकारी पदार्थ आत्ता बनवून ठेवले जातात. अश्या  बेकरी पदार्थांमध्ये नानकटाई हा सर्वात सोपी व अधिक पौष्टीक असा पदार्थ आहे म्हणूनच आम्ही नानकटाई बनवण्याची ठरवली.
 नानकटाई साठी आपल्याला तूप, मैदा ,पिठीसाखर ,कलर या वस्तूं लागतात .
250 gm तुपाची क्रिम तयार करून घेतली.
त्यामध्ये 250 gm पिढीसाखार टाकून त्याचीही क्रीम तयार करून घेतली .
या क्रिम मधेच 500 gm मैदा टाकून सर्वांचा एकजीव पिठाचा गोळा तयार तयार करून घेतला आणि या गोळ्यामधून छोटे छोटे हव्या त्या आकाराची नानकटाई ओव्हन मध्ये बनवली.
170 अंश तापमानाला ही नानकटाई ओव्हन मध्ये भाजण्यास ठेवले. 
ओव्हन मधून 15 min नानकटाई भाजून झाल्यावर ती काडून घेतली.
अश्या प्रकारे नानकटाइ तयार केली.
विक्री किंमत - एकूण खर्च = नफा
120  रुपये  --    75  =   45


ओली भेळ तयार करणे




आताच्या धकाधकीच्या काळामध्ये  लोकांचा कमी वेळात  झटपट तयार  होणारे अन्नपदार्थ खाण्याकडे जास्त कल आहे.
असा पदार्थ कोणता तर सहाजिकच सगळ्यांच्या तोंडून एकच उत्तर येतं ती म्हणजे ओली भेळ .
म्हणून मोड आलेली मटकी  टाकलेली  पौष्टिक
ओली भेळ हा खाद्यपदार्थ फार लोकप्रिय म्हणून ओळखला जात आहे . म्हणून   ओली भेळ करण्याचे ठरविले . 
यामध्ये मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो ,लसूण, मीठ  ,मिरची पावडर , हळद  जिरी ,मोहरी, तेल, कोथिंबीर ,कढीपत्ता , फरसाण ,  मुरमुरे  , चिंचेचे आंबटगोड पाणी हे प्रामुख्याने साहित्य लागते.
वर्गातील मुलांचे दोन गट पाडले. पहिल्या गटातील मुलांनी साहित्याची यादी करून साहित्य आणले. तर दुसर्‍या गटाने किचन व भांड्याची स्वच्छता करून घेतली. पहिल्या गटाने आलेली मटकी निवडून दिली मग कांदा ,टोमॅटो बारीक  चिरून  घेतला . कोथिंबीर निवडून बारीक चिरून  ठेवली . दुसऱ्या गटाने  एका पातेल्यात फोडणी देण्यासाठी तेल टाकून   मोहरी ,जीरी ,हळद, लसूण, कांदा  , कढीपत्ता ,टाकून  हिरवी मिरचीची पेस्ट  टाकून मटकी चांगली  शिजवून घेतली .  मुरमुरे चांगले निवडून घेऊन त्यामध्ये हळद ,मिरची पावडर , मीठ टाकून  ते मुरमुरे पिवळे करून घेतले . चिंचेचे गोड आंबट पाणी  तयार करून घेतले . हे सर्व साहित्य तयार झाल्यानंतर  डिश भरण्यास सुरुवात केली . प्रत्येक डिशमध्ये मुरमुरे , चिरलेला कांदा-टोमॅटो , कोथिंबीर  मटकी टाकून मिक्स करून घेतले . त्यावर चिंचेचे गोड आंबट पाणी टाकून  ओली भेळ तयार  केली . या ओळीचा प्लेट भरून विक्री केली .
विक्री किंमत - एकूण खर्च  नफा 23  रुपये प्लेट * 10 = 230. -  212 = 18

कच्ची दाबेली तयार करणे



आताच्या  काळामध्ये  बऱ्याच लोकांना तेलकट  खाण्यावर डॉक्‍टरांनी बंदी घातली आहे आणि बऱ्याच  लोकसंख्येमध्ये वजन वाढ जास्त दिसून येत असल्यामुळे तेलकट पदार्थ खाण्यास नकार येत आहे   त्यामुळे कमी वेळात  झटपट तयार  होणारे अन्नपदार्थआणि पौष्टिक खाण्याकडे जास्त कल आहे.
            कच्ची दाबेली  हा खाद्यपदार्थ  पौष्टिक   म्हणून बरेच जण खातात  बऱ्याच जणांचा कच्ची दाबेली पदार्थ खाण्याकडे कल दिसून येत आहे .यामध्ये डाळिंब ,बटाटा, कांदा, लिंबू ,बडीशेप, शेंगदाणे ,गरम मसाला , लसुन, लाल मिरची पावडर , कोथिंबीर ,कढीपत्ता, तेल,पाव,गावरान तूप  किंवा बटर असले तरी चालते, हळद, जिरी, मोरी ,ओवा, मीठ  इत्यादी .
डाळिंब फोडून त्याचे दाणे तयार केले . बटाटे उकडून सोलून घेतले . शेंगदाणे भाजून त्याच्यावरील टाकले काढून शेंगदाणे अर्धे-अर्धे करून घेतले . कांदा एकदम बारीक चिरून घेतला . लसूण सोलून घेतला त्यामध्ये लाल मिरची पावडर व एक लिंबू पिळून टाकले व त्याची चटणी तयार करून घेतली . चिरलेला बारीक कांदा कढईमध्ये घेऊन थोडे बटर टाकून तो कांदा लाल करून घेणे
. जिरे ,मोहरी ,कढीपत्ता ,हळद , बडीशेप , मिरची पावडर ,गरम मसाला टाकून  थोडे पाणी टाकून तो कांदा शिजवून घेतला . यामध्ये उकडलेला बटाटा बारीक करून टाकला . सर्व मिश्रण एकजीव केले. एका ताटामध्ये काढून घेतले त्या वरती डाळिंबाचे दाणे आणि  शेंगदाणे टाकून  सजवून घेतले . आता एका पावाचे दोन भाग करून त्यामध्ये हा मसाला भरून  पाव बंद करून  तव्या मध्ये बटर टाकून पाव दोन्ही बाजूने  गरम करून घेतला.अशाप्रकारे कच्ची दाबेली तयार झाली.

विक्री किंमत - एकूण खर्च  नफा
40 रुपये प्लेट * 10 = 400. -  351= 49


प्लायवूडचा पाट बनवणे.

शाळा    श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ इयत्ता आठवी च्या मुलांनी सुतार काम यामध्ये प्लायवुड पासून पाट  बनविण्याचे ठरविले. त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य व साधनांची ओळख करून घेतली. पाटाचे ड्रॉईंग तयार करून त्यानुसार प्लायवूड कट करून घेतले व मुलांनी पाट बनवण्यास सुरुवात केली .यामध्ये मुलांना मोजमाप, गुन्या, कटिंग करणे अशा प्रकारचे ज्ञान मुलाना मिळाले .मटेरियल खर्च70 रुपये मजुरी 21 रुपये एकूण खर्च 91 रुपये आला.