Thursday, 18 October 2018

रंग काम करणे

शाळेचे गेट नवीन बनवायचे असल्यामुळे हे गेट कॉन्ट्रॅक्टदार आणि घेतले होते. मुलींनी गेटचे वेडिंग चे काम थोड्याफार प्रमाणे मध्ये केले. गेटचे वेल्डिंगचे काम झाल्यानंतर त्यांनी मुलींना रंग देण्यासाठी सांगितले.  रंग देताना दहावीच्या मुलांनी  काळा रंग देण्यासाठी सुरुवात केली .रंग देत असताना ब्रशचा कशा प्रकारे वापर करायचा हे लक्षात आले. रंग कशाप्रकारे घेतला पाहिजे हे मुलांना अनुभवामुळे हळूहळू लक्ष येऊ लागले. त्यामुळे  रंग घेत असताना किती घेतला पाहिजे हे समजले रंग काम करत असताना सुरक्षितता कोणती बाळगली पाहिजे त्यामध्ये कपड्यावर  पडून देऊ नये . काम झाल्यानंतर ब्रश रॉकेलमध्ये बुडवून ठेवावे हे सर्व काम करत असताना गेटला रंग देण्याचा आलेला अंदाजे खर्च मजुरीसह 725 रुपये इतका आला.


                                                                             
        

         

पर्जन्यमापक तयार करणे

पर्जन्यमापक बनविण्याचा उद्देश आपण नियमित बातम्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यात किती पाऊस पडला आहे हे पाहत असतो पण आपल्याला आपण ज्या गावांमध्ये राहतो त्या गावांमध्ये किती पाऊस पडला आहे हेच माहीत नसते त्यामुळे मुलांनी पर्जन्यमापक तयार केले तयार करण्याचे ठरवल्यानंतर मुलांनी त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे डिझाईन सुचवले व त्यातील दोन मॉडेल तयार करणे त्यामध्ये विचार करण्यास शिकले त्यांचा आत्मविश्‍वास वाढला उपकरण तयार करण्यासाठी सर्व साहित्य जमा केले व काम करण्यास सुरुवात केली काम करताना सुरक्षिततेचे नियम लक्षात घेऊन सर्व कामे पूर्ण केली कटिंग करताना गॉगलचा वापर केला वेडिंग करताना स्क्रीनचा वापर केला रंग देताना स्वतःच्या कपड्यांची काळजी घेतली अशी सर्व कामे पूर्ण झाल्यावर पर्जन्यमापक  शाळेच्या इमारतीवर  बसविले गेले साहित्य सर्व जाग्यावरती ठेवून दिले दुसऱ्या दिवशी  पाऊस त्यामध्ये किती पडला गेला हे मोजला एक पर्जन्यमापक तयार करण्यासाठी 76 रुपये खर्च आला अशी आम्ही दोन बनवली त्यासाठी 152 रुपये मजुरी सह खर्च आला



वीट बांधकाम( विटांच्या रचना)

  शाळेमध्ये आयटीआय विभागाचे मोठे बांधकाम चालू होते .त्या बांधकाम मध्ये काही भाग मुलींनी प्रॅक्टिकल साठी निवडला .हा भाग निवडल्यानंतर फाउंडेशन  हे लेवल ट्यूबच्या साह्याने कसे करावयाचे हे मुलींना शिकण्यास मिळाले .त्यानंतर  बांधकाम करत असताना सिमेंट व वाळू यांचे प्रमाण किती घ्यायचे हे मुलींना समजले. त्याचबरोबर विटा एका लाईन मध्ये ठेवत असताना लाईन दोरीचा वापर कशाप्रकारे करायचा हे समजले. कोपऱ्यामध्ये गुण्या चा वापर कशाप्रकारे करायचा हे समजले. ओळंबा कशाप्रकारे वापरायचा हे समजलं .हे बांधकाम करत असताना वेगवेगळे बोंड चे प्रकार आहेत हे सांगण्यात आले.
        बांधकाम करत असताना घ्यावयाच्या दक्षता ह्या मुलींना सांगण्यात आल्या उदाहरणार्थ हातामध्ये रबरी हॅन्ड ग्लोज वापरणे. पायात रबरी बूट घालने. काम झाल्यावर सर्व  साहित्य धुवून  ठेवणे.
        हे काम मोठ्या स्वरूपाचे असल्यामुळे त्याची अंदाजे किंमत मजुरीसह 3500 पर्यंत  आली. हे काम मोठ्या स्वरूपाचे  पाहिल्यानंतर मुलींना कामाचा अनुभव व अंदाज आला.




डेकोरेशन साठी लहान बल्बच्या माळा बनविणे

गणेश उत्सवा निमित्त शाळेत आ बी टी ऊर्जा पर्यावरण विभागांमध्ये डेकोरेशनच्या माळा तयार करण्यास सुरुवात केली
माळा तयार करत असताना मुलांना सोल्डरिंग चा उपयोग कसा करावयाचा हे शिकण्यास मिळाले त्यानुसार एका माळेमध्ये किती बल्ब असणे गरजेचे आहे हे समजले माळ बंद झाले असता ती कशी दुरुस्त करायची हे समजले 
50 बल्ब च्या माळेचा खर्च  760 रुपये मजुरी सह
त्यामुळे तीन डेकोरेशनच्या माळा साठी लागणारा खर्च 2220 रूपये मजुरीसह.



Saturday, 1 September 2018

भाजीपाला लागवडीसाठी वाफे तयार करणे


शाळेसमोर भाजीपाला लागवड करण्यासाठी सरी वरंबा व इतर वाफे तयार  करताना  मुले 

भेळ आणि वडापावची विक्री करणे


विज्ञान आश्रम चे  संस्थापक डॉ. कलबाग सर यांच्या स्मृति दिनानिमित्त विज्ञान आश्रम मध्ये ओली  भेळ  आणि वडा पाव चा स्टॉल लावला  स्टॉल वर  ४४०७ रु.विक्री केली. 

पॉवर कटर   मदतीने लोखंड कट करताना मुले

पॉवर कटर   मदतीने लोखंड कट करताना मुले.