Friday, 19 October 2018
Thursday, 18 October 2018
गणेश उत्सवासाठी चिक्कीची खिरापत तयार करणे
भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ या प्रशालेत विद्यार्थी विकास मंडळा तफें गणेश उत्सव साजरा करण्यात आला होता .या गणेश उत्सवा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची खिरापत देत होते त्या मध्ये मुरमुरे ,केळी ,भेळ या सारखे पदार्थाचे खिरापत म्हणून वाटप करण्यात येते होते .आपल्या प्रशालेत आ.बी.टी.विभागांतर्गत चिक्की तयार करण्यात येते अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना सांगितले व चिक्की च्या पौष्टिक ते बद्दल माहिती समजावून सांगितले म्हणून आय.बी.टी.च्या विद्यार्थ्यांना 1900 पाकीटे तयार करण्याची आँडर मिळाली .या मध्ये इयत्ता 10वी च्या मुले व मुली यांच्या मदतीने साखर व शेंगदाणे चे25 किलो मटेरियल वापरून 1900 पाकिटे तयार झाली .या प्रकल्पा मध्ये इयत्ता 10वी च्या 26 मुलांनी काम केले .
या प्रकल्पा मध्ये कामाचे प्लॅनिग करताना काही मुले शेंगदाणे भाजुन देत होते तर काही मुले मिक्सर वर शेंगदाणे चा कुट तयार करत होती तर त्याच वेळेस काही मुले चिक्की साठी पाक तयार करीत होती .काही मुले चिक्की लाटुन पाहिजे त्या आकारात कापुन देत होती .काही मुले पॉकिंग करीत होती .अशा प्रकारे सर्व पोसेसिंग साठी चार चार मुंलांचे गट तयार करण्यात आले होते .
तयार झालेली पाकीटे 1900
ऊर्जा पर्यावरण विभागासाठी सहा टूल बनविणे.
मुलांनी प्रथम ऊर्जा पर्यावरण विभागासाठी जे6 स्टूल बनवायचे आहे. त्याचे सुरुवातीला ड्रॉइंग काढले .व अंदाजपत्रक तयार केले. अंदाजपत्रकानुसार मटेरियल खरेदी केले .मटेरियल खरेदी केल्यानंतर ड्रॉईंग च्या मापानुसार कट करून घेतले .मग वेल्डिंग करण्यास सुरुवात केली. वेल्डिंग करत असताना ज्या दक्षता आहेत त्या सांगितल्या. उदाहरण पायामध्ये चप्पल किंवा बूट घातले पाहिजेत .हातामध्ये कापडी हॅन्ड ग्लोज घातले पाहिजे. गॉगल किंवा स्क्रीन चा वापर केला पाहिजे.
त्याचबरोबर सनमाइका व प्लायवूड कट करून घेतले. काही मुलांनी प्लायवुड बसविण्यासाठी अंगला ड्रिल पाडले .रंगकाम केले .टॉप बसविला टूल करताना कामाचा अनुभव आला .पूर्ण झाल्यानंतर त्याची किंमत काढली एकूण सहा स्टूल ची किंमत मजुरीसह 2909 रुपये इतकी आली. विक्री किंमत 3209 रुपये निव्वळ नफा 300रुपये .
ऊर्जापर्यावरण विभागामध्ये प्रॅक्टिकल साठी वेगवेगळे सर्किट बोर्ड तयार करणे
इयत्ता दहावीच्या मुलींनी प्रकल्पामध्ये कम्युनिटी सर्विस मध्ये बोर्ड तयार करायला घेतले. त्याचे ड्रॉइंग तयार केले .ड्रॉइंग नुसार प्लायवुड कट करून घेतले. होल्डर व स्विच च्या मापाची खा च पाडल्यानंतर बोर्डला होल्डर व स्वीच बसविले आणि बोर्ड तयार झाल्यावर एकूण 9 बोर्ड ची किंमत काढली. एकूण किंमत मजुरीसह 2160 रुपये आली.
Subscribe to:
Posts (Atom)










