Thursday, 2 April 2020

स्टूलसाठी प्लायवूडचा टॉप बनवणे.

शाळा श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ इयत्ता नववीच्या मुलांनी आय .बी. टी .अभियांत्रिकी विभागात वेल्डिंग प्रॅक्टिकल यामध्ये स्टूल बनवण्याचे ठरवले यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जुळवाजुळव करून मटेरियल खरेदी केले. व ते मटेरियल
ड्रॉईंग च्या मापानुसार कट करून  वेल्डिंग करून घेतले टॉप साठी लागणारे प्लायवूड कट करून घेतले यामध्ये मुलांना वेल्डिंग गुण्या मोजमाप कशा प्रकारे करायचे हे शिकण्यास मिळाले स्टूल साठी मटर खर्च 300 रुपये मजुरी 90 रुपये एकूण खर्च 390 रुपये आला.

स्टूल बनवणे.


शाळा श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ. इयत्ता दहावीच्या मुलांचे प्रात्यक्षिक परीक्षा चालू असताना त्यामध्ये मुलांनी स्टूल बनवला. यामध्ये मुलांना मोजमाप कटिंग, वेल्डिंग अशा प्रकारचे काम कराव्यास लागले. यामध्ये आलेल्या एक्झामिनरने मुलांना काही प्रश्न विचारले. स्टूल साठी लागणारे मटेरियल खर्च 250 रुपये मजुरी 75 रुपये व एकूण किंमत 320 रुपये इतका आला.

Wednesday, 1 April 2020

शोष खड्डा तयार करणे.

शोष खड्डा तयार करणे.

शोष खड्डा तयार करणे हे प्रात्यक्षिक करण्यासाठी आम्ही शाळेच्या सकस आहार योजनेच्या किचन बाहेर ची जागा निवडली. स्वयंपाकाचे पाणी ,भांडी धुणे, हात धुणे नंतरचे पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोष खड्डा तयार करण्याचे ठरविले. अगोदर या ठिकाणी पाणी साठून राहत होते व मच्छर तयार होत होते डुक्कर, कुत्री या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत होती.  दोन फुट*
 दोन फुट* दोन फुट या मापाचा खड्डा खोदला त्यामध्ये थोडे विटांचे तुकडे ,वाळू ,कोळसा टाकून खड्डा भरून घेतला व सांडपाणी व्यवस्थित खड्ड्यात जाईल असे काढून दिले. यासाठी मटेरियल खर्च 325 रुपये मजुरी 125 रुपये एकूण लोकोपयोगी सेवा 450 रुपये झाली.

पत्रा शेड साठीच्या स्क्वेअर ट्यूब पाईपला रंगकाम करणे.

पत्रा शेड साठीच्या स्क्वेअर ट्यूब पाईपला रंगकाम करणे.

आय .बी. टी. विभागांमध्ये इयत्ता दहावीच्या मुलांचे रंगकाम हे प्रॅक्टिकलघ्या घ्यावयाचे होते. तेव्हा शाळेमध्ये पत्र्याखाली स्क्वेअर ट्यूब ठेवण्यासाठी व ऊभे खाऺब हे पावसाळ्यात गंजू नये म्हणून त्याला रंग काम करावयास घेतले . काळा रंग देण्याचे ठरवले यामध्ये मुलांना रंग कसा व कशासाठी द्यायचा . वेगवेगळ्या रंगाची कव्हरिंग पावर एका लिटर किती असते. ब्रश कसा वाचायचा ,रोलर कसा वापरायचा काम झाल्यानंतर रॉकेल मध्ये ब्रश बुडवून ठेवला पाहिजे .याविषयी मुलांना ज्ञान मिळाले.
यासाठी मटेरियल खर्च 750 रुपये मजुरी 200 रुपये एकूण खर्च 950 रुपये आला.


मेथी भाजीपाला लागवड करणे.

मेथी भाजीपाला लागवड करणे.

भाजीपाला लागवड करण्यासाठी ऑफिसच्या शेजारील  जागा  निवडली . त्या ठिकाणी गवत झालेले होते  ते गवत  यानिमित्ताने  निघून जाईल  व तेथे वाफा तयार करून  भाजीपाला लागवड करता येईल . असा विचार  विद्यार्थ्यांनी केला. जागेचे मोजमाप घेतले. साहित्य साधने घेऊन जमिनीची मशागत केली. वाफे तयार केले . यामध्ये भाजीपाला लागवड करण्यास विद्यार्थी शिकले यासाठी मटेरियल खर्च 40 रूपये व मजुरी 100 रुपये असे 140 रुपये कामाचे मूल्य झाले.





शाळेच्या मैदानात व मागील परिसरात तणनाशक औषधाची 11 पंप फवारणी करणे.

शाळेच्या मैदानात व मागील परिसरात  तणनाशक औषधाची 11 पंप फवारणी करणे. 

यावर्षी पाबळ परिसरामध्ये ओला दुष्काळ सदृश परिस्थिती झाली .सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण परिसरात खूप तणांची उगवण झाली .शाळेला प्रथम सत्र परिक्षा  व  नंतर दिवाळीची दीर्घ सुट्टी असल्यामुळे शाळेच्या आवारात बागेत तसेच शाळेच्या पाठीमागील परिसरात सगळीकडे खूपच गवत मोठे झाले होते .परिसरात साप वगैरे पण आढळत असल्यामुळे काळजी घ्यावी म्हणून शाळेच्या मैदानात व मागील परिसरात तननाशक फवारणी करावयाची असे शाळेच्या पर्यवेक्षकांनी ठरवले .फवारानाऱ्या माणसाला पाचारण केले .
        विदयार्थ्यांनी  प्रात्यक्षिकांमध्ये ही फवारणी करू शकतो म्हणून सरांना विनंती केली. मैदानातल्या परिसरामध्ये तुम्ही फवारा व मागील मोठ्या गवतामध्ये प्रोफेशनल फवारनाऱ्या माणसाला फवारणी करू द्या अशी सूचना दिली .तुम्ही त्यांना बाकी सर्व मदत करा व ट्रेनिंग पण घ्या असे ठरले .या तननाशक फवारणी प्रकल्पामध्ये विदयार्थ्यांनी  एस पी बोलो पंपाच्या मदतीने अकरा पंप औषधाची फवारणी केली .ही फवारणी करताना औषध कसे मिसळावे ,फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, कशी फवारणी करावी, त्याचा हिशेब कसा करावा ,पंप कसा वापरावा या सर्व गोष्टी विद्यार्थी शिकले .रासायनिक औषधे  व सेंद्रिय औषधे  यामधील फायदे तोटे विद्यार्थ्यांना समजले.  शाळेतील समाज उपयोगी सेवा सुद्धा पूर्ण झाली.
        यासाठी औषधाचा खर्च 747 रुपये पंपाचे पेट्रोल व  मजुरी 440 रुपये असा एकूण खर्च 1187 रुपये झाला.


टेबल टॉप बसून टेबल दुरुस्ती करणे.

टेबल टॉप बसून टेबल दुरुस्ती करणे.

आय. बी .टी .अभियांत्रिकी विभागात इयत्ता दहावीच्या मुलांनी सुतारकाम यामध्ये टेबल दुरुस्ती करण्याचे ठरविले. शाळेच्या साफसफाई मध्ये एक टेबल बाहेर काढून ठेवला होता. त्याचा टॉप हा खराब झाला होता. मग मुलांनी त्यावर दुसरा टॉप बसवण्याचे ठरवले त्यासाठी चार फूट बाय दोन फुटाचे प्लायवूड कटर मशिनच्या साह्याने कट करून  घेतले यामध्ये मुलांना गुण्या कसा करायचा ,प्लायवूड कसे कट करायचे ,त्याची किंमत कशी काढायची अशा प्रकारचे ज्ञान मुलांना मिळाले. मटेरियल खर्च 410 रुपये  मजुरी 120 रुपये एकूण खर्च 530 रुपये इतका आला.