Wednesday 28 November 2018

गृह विभागात कमी खर्चात सेंट तयार करताना

गृह विभागात कमी खर्चात सेंट तयार करताना

एका बॉटलमध्ये -30 ml
तयार बॉटल -12 नग
एका बॉटल चे विक्री किंमत - 70 Rs.
विक्री झालेल्या बॉटल - 6 नग




रक्तदाब तपासताना इयत्ता नववीचे विद्यार्थी

रक्तदाब तपासताना इयत्ता नववीचे विद्यार्थी


निमगाव म्हाळुंगी या प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक पवार सर  आणि तळेगाव ढमढरे या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय पवार सर  यांचा  रक्तदाब तपासताना श्री  भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ या प्रशालेचे इयत्ता नववी चे विद्यार्थी. या दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक  यांनी आयबीटी विभागा ची  माहिती घेतली.  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.




सोल्डरिंग करणे

सोल्डरिंग करणे


अभियांत्रिकी विभागांमध्ये इयत्ता आठवीच्या मुलांना सोल्डरिंग प्रॅक्टिकल हे घ्यावयाचे ठरविले.
त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची व साधनांची तरतूद करून घेतली .यामध्ये जी .आय. पत्र घेतला व त्याचा जॉईंट केला
त्यानंतर मुलांनी फ्लक्स तयार केले व ब्लो लॅम्प वरती तांब्याचा खड्या तापवून सोल्डरिंग करावयास सुरुवात केली
 यामध्ये मुलांना सोल्डरिंग कसे करायचे हे शिकण्यास मिळाले .सोल्डरिंग प्रॅक्टिकल साठी 105 रुपये खर्च आला.

Attachments area

गृह आरोग्य विभागात कांदा भजी विक्री करताना विद्यार्थी

गृह आरोग्य विभागात कांदा भजी विक्री करताना

16 प्लेट 10 रुपये प्लेट  वीकी किंमत 160 रु पये खर्च 132रुपये नफा      28 रुपये


दशपर्णी अर्काची फवारणी करताना विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दशपर्णी अर्काची फवारणी शाळेतील झाडांवर केली

गृह आरोग्य पॅटीस तयार करणे

गृह आरोग्य पॅटीस तयार करणे

ऊर्जा पर्यावरण विभागात मिक्सर ची भांडी दुरुस्त करताना मुली

ऊर्जा पर्यावरण विभागात मिक्सर ची भांडी दुरुस्त करताना मुली




उर्जा पर्यावरण विभागात  मिक्‍सर दुरुस्त करताना मुली

उर्जा पर्यावरण विभागात  मिक्‍सर दुरुस्त करताना मुली 




विषय  - मिक्सर व मिक्सर ची भांडी दुरुस्ती करणे .
 ऊर्जा पर्यावरण विभागात विद्युत उपकरणे दुरुस्ती शिकताना इयत्ता दहावी च्या विद्यार्थिनीसाठी मिक्सर व मिक्सर ची भांडी दुरुस्ती हा प्रकल्प घेतला .मुलींच्या दृष्टीने  दैनंदिन जीवनात अत्यंत उपयोगी प्रकल्प आहे असे मुलींना वाटले. मिक्सर दुरुस्ती साठी शाळेतील शिक्षिका सौ. झोडगे मॅडम यांनी आणला होता .त्याचबरोबर तीन भांडी दुरुस्तीसाठी आणली होती. हा मिक्सर टेस्ट लॅम्प ने चेक केल्यावर वाइंडिंग खराब झाले हे समजले .त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या मटेरियल ची माहिती घेऊन यादी तयार केली. मिक्सरची वायरिंग व मोटर ची माहिती घेऊन मिक्सर खोलून दुरुस्ती नंतर पुन्हा जोडणी करून मिक्सर चालू केला .तसेच भांडी ही खोलली बुश, कपलर् शाफ्ट, ब्लेड इत्यादींची दुरुस्ती केली .हे काम करताना टेस्ट लॅम्प चा वापर , फील्ड वाइंडिंग,  आर्मिचर वाइंडिंग ,कार्बन ब्रश यांचे ज्ञान मिळाले. मिक्सर खोलने पुन्हा संपूर्ण जोडणी करणे यांचे ज्ञान मिळाले. मिक्सर दुरुस्ती व भांडी  दुरुस्ती यासाठी मटेरियल  खर्च  440  रुपये आला . लोकोपयोगी सेवा म्हणून 520 रुपये मिळाले .

ड्रिल मशीन ठेवण्यासाठी स्टॅंड तयार करणे.

विषय   ड्रिल मशीन ठेवण्यासाठी 
 स्टॅंड तयार करणे.
अभियांत्रिकी विभागांमध्ये ड्रिल मशीन ठेवण्यासाठी इयत्ता नववीच्या मुलांनी स्टॅंड तयार करण्यास घेतले. ड्रॉइंग तयार केले व त्यानुसार मटेरियल खरेदी केले. मटेरियल खरेदी केल्यानंतर कामाला सुरुवात केली .यामध्ये मशीन साठी जागा  निवडली व त्याठिकाणी खोदकाम केले वेडिंग केलेले स्टॅन्ड पाडलेल्या खड्ड्यामध्ये  बसले त्याची किंमत 613 रुपये इतकी आली

Monday 19 November 2018

टेडी बनविताना मुले

 टेडी बनविताना विद्यार्थिनी. 


श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ  या प्रशालेत इयत्ता दहावीच्या मुलींनी टेडी तयार करणे हा प्रोजेक्ट घेतला होता.
सध्या शोभेच्या वस्तू नवनवीन बाजारात येत आहेत  आणि शोभेच्या वस्तू ला  खूप बाजारपेठेत मागणी पण आहे म्हणून मुलींनी टेडी तयार करणे हा प्रोजेक्ट निवडला.



टेडी सध्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिले जाते. लग्नसमारंभात मुलींकडून पालक  शोभेची वस्तू म्हणून रुखवदात  मांडतात. घरामध्ये शोभेच्या वस्तू म्हणून सर्रास सर्व घरांमध्ये वापर केला जातो. टेडी तयार करणे  हा  घरगुती व्यवसाय  म्हणून खूप फायद्याचा ठरू शकतो. टेडी तयार करण्यासाठी  फर , ऍक्रेलिक कापड  ,कापूस, धागा ,सुई  इत्यादी  साहित्य वापरून  टेडी तयार करण्यात आला.
टेडी संख्या खर्च  विक्री किंमत नफा
20  नग    5000 रु   6000 रु  1000  रु



गृह आरोग्यात प्लास्टिक बंदी ला पर्याय म्हणून कापडी पिशव्या शिवणाऱ्या मुली

गृह आरोग्यात प्लास्टिक बंदी ला पर्याय म्हणून कापडी पिशव्या शिवणाऱ्या मुली

गृह विभागात पेरू जेली तयार करताना

गृह विभागात पेरू जेली तयार करताना


पेरू जेली तयार करणे.     
श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ  या प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पेरू जेली तयार करणे हे प्रॅक्टिकल केले. 
पावसाळ्यात पेरू पटकन खराब होतात  त्यामुळे  पावसाळ्यात पेरूला कमी मागणी असते  म्हणून पेरू स्वस्त होतात 
जेली तयार करून ठेवल्यास उपयोगी ठरते. जेली तयार करण्यासाठी  पेरू साखर लिंबू ( सायट्रिक ऍसिड )दालचिनी वापरून
 जेली तयार होते.

तयार जेली    एकूण खर्च      विक्री किंमत     नफा
250gm           64.80रु        80 रु           13  रु

पाबळ बीटाचे केंद्रप्रमुख व  प्राचार्य यांची  आय. बी .टी. विभागाला सदिच्छा भेट .सोबत समन्वयक ,निदेशक व विद्यार्थी त्यांना माहिती देताना.




Jun   2018                             आय. बी. टी. विषयाचे महत्व व माहिती समजावून सांगताना प्राचार्य, समन्वयक ,निदेशक तसेच ऐकताना मग्न झालेले इयत्ता आठवीचे चारही तुकड्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनी.

अभियांत्रिकी विभागात शेती पशुपालन विभागासाठी फावड्या तयार करताना मुले

अभियांत्रिकी विभागात शेती पशुपालन विभागासाठी फावड्या तयार करताना मुले


                                                                                    अभियांत्रिकी विभागात नववीच्या मुलांनी शेतीतील वाफे  बांधणी करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या 6 फावड्या बनवायचे    ठरवले. मुलांनी प्रथम ड्रॉइंग तयार केले व त्यानुसार मटेरियल खरेदी केले. मटेरियल खरेदी केल्यानंतर हे मटेरियल ड्रॉइंगच्या मापानुसार कटिंग केले व पाईप  माती ओढणाऱ्या पत्र्याला वेल्डिंग केला .फावड्या बनविल्यानंतर रंग देण्या अगोदर त्या फावड्या पाॅलीस पेपर च्यासाह्याने घासून घेतल्या. व रंग देण्यास सुरवात केली. यामध्ये मुलांना रंग काम, वेल्डिंग, कटिंग शिकण्यास मिळाले. काम पूर्ण झाल्यानंतर सहा फावड्याची एकूण मटेरियल खर्च 1336 रुपये  आला. प्रत्येक फावडी 250  रुपये इतकी किमतीने विकल्यास सहा फावड्यांची एकूण किंमत 1500 रुपये व नफा 164 रुपये झाला.