Wednesday 28 November 2018

गृह विभागात कमी खर्चात सेंट तयार करताना

गृह विभागात कमी खर्चात सेंट तयार करताना

एका बॉटलमध्ये -30 ml
तयार बॉटल -12 नग
एका बॉटल चे विक्री किंमत - 70 Rs.
विक्री झालेल्या बॉटल - 6 नग




रक्तदाब तपासताना इयत्ता नववीचे विद्यार्थी

रक्तदाब तपासताना इयत्ता नववीचे विद्यार्थी


निमगाव म्हाळुंगी या प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक पवार सर  आणि तळेगाव ढमढरे या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय पवार सर  यांचा  रक्तदाब तपासताना श्री  भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ या प्रशालेचे इयत्ता नववी चे विद्यार्थी. या दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक  यांनी आयबीटी विभागा ची  माहिती घेतली.  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.




सोल्डरिंग करणे

सोल्डरिंग करणे


अभियांत्रिकी विभागांमध्ये इयत्ता आठवीच्या मुलांना सोल्डरिंग प्रॅक्टिकल हे घ्यावयाचे ठरविले.
त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची व साधनांची तरतूद करून घेतली .यामध्ये जी .आय. पत्र घेतला व त्याचा जॉईंट केला
त्यानंतर मुलांनी फ्लक्स तयार केले व ब्लो लॅम्प वरती तांब्याचा खड्या तापवून सोल्डरिंग करावयास सुरुवात केली
 यामध्ये मुलांना सोल्डरिंग कसे करायचे हे शिकण्यास मिळाले .सोल्डरिंग प्रॅक्टिकल साठी 105 रुपये खर्च आला.

Attachments area

गृह आरोग्य विभागात कांदा भजी विक्री करताना विद्यार्थी

गृह आरोग्य विभागात कांदा भजी विक्री करताना

16 प्लेट 10 रुपये प्लेट  वीकी किंमत 160 रु पये खर्च 132रुपये नफा      28 रुपये


दशपर्णी अर्काची फवारणी करताना विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दशपर्णी अर्काची फवारणी शाळेतील झाडांवर केली

गृह आरोग्य पॅटीस तयार करणे

गृह आरोग्य पॅटीस तयार करणे

ऊर्जा पर्यावरण विभागात मिक्सर ची भांडी दुरुस्त करताना मुली

ऊर्जा पर्यावरण विभागात मिक्सर ची भांडी दुरुस्त करताना मुली




उर्जा पर्यावरण विभागात  मिक्‍सर दुरुस्त करताना मुली

उर्जा पर्यावरण विभागात  मिक्‍सर दुरुस्त करताना मुली 




विषय  - मिक्सर व मिक्सर ची भांडी दुरुस्ती करणे .
 ऊर्जा पर्यावरण विभागात विद्युत उपकरणे दुरुस्ती शिकताना इयत्ता दहावी च्या विद्यार्थिनीसाठी मिक्सर व मिक्सर ची भांडी दुरुस्ती हा प्रकल्प घेतला .मुलींच्या दृष्टीने  दैनंदिन जीवनात अत्यंत उपयोगी प्रकल्प आहे असे मुलींना वाटले. मिक्सर दुरुस्ती साठी शाळेतील शिक्षिका सौ. झोडगे मॅडम यांनी आणला होता .त्याचबरोबर तीन भांडी दुरुस्तीसाठी आणली होती. हा मिक्सर टेस्ट लॅम्प ने चेक केल्यावर वाइंडिंग खराब झाले हे समजले .त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या मटेरियल ची माहिती घेऊन यादी तयार केली. मिक्सरची वायरिंग व मोटर ची माहिती घेऊन मिक्सर खोलून दुरुस्ती नंतर पुन्हा जोडणी करून मिक्सर चालू केला .तसेच भांडी ही खोलली बुश, कपलर् शाफ्ट, ब्लेड इत्यादींची दुरुस्ती केली .हे काम करताना टेस्ट लॅम्प चा वापर , फील्ड वाइंडिंग,  आर्मिचर वाइंडिंग ,कार्बन ब्रश यांचे ज्ञान मिळाले. मिक्सर खोलने पुन्हा संपूर्ण जोडणी करणे यांचे ज्ञान मिळाले. मिक्सर दुरुस्ती व भांडी  दुरुस्ती यासाठी मटेरियल  खर्च  440  रुपये आला . लोकोपयोगी सेवा म्हणून 520 रुपये मिळाले .

ड्रिल मशीन ठेवण्यासाठी स्टॅंड तयार करणे.

विषय   ड्रिल मशीन ठेवण्यासाठी 
 स्टॅंड तयार करणे.
अभियांत्रिकी विभागांमध्ये ड्रिल मशीन ठेवण्यासाठी इयत्ता नववीच्या मुलांनी स्टॅंड तयार करण्यास घेतले. ड्रॉइंग तयार केले व त्यानुसार मटेरियल खरेदी केले. मटेरियल खरेदी केल्यानंतर कामाला सुरुवात केली .यामध्ये मशीन साठी जागा  निवडली व त्याठिकाणी खोदकाम केले वेडिंग केलेले स्टॅन्ड पाडलेल्या खड्ड्यामध्ये  बसले त्याची किंमत 613 रुपये इतकी आली

Monday 19 November 2018

टेडी बनविताना मुले

 टेडी बनविताना विद्यार्थिनी. 


श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ  या प्रशालेत इयत्ता दहावीच्या मुलींनी टेडी तयार करणे हा प्रोजेक्ट घेतला होता.
सध्या शोभेच्या वस्तू नवनवीन बाजारात येत आहेत  आणि शोभेच्या वस्तू ला  खूप बाजारपेठेत मागणी पण आहे म्हणून मुलींनी टेडी तयार करणे हा प्रोजेक्ट निवडला.



टेडी सध्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिले जाते. लग्नसमारंभात मुलींकडून पालक  शोभेची वस्तू म्हणून रुखवदात  मांडतात. घरामध्ये शोभेच्या वस्तू म्हणून सर्रास सर्व घरांमध्ये वापर केला जातो. टेडी तयार करणे  हा  घरगुती व्यवसाय  म्हणून खूप फायद्याचा ठरू शकतो. टेडी तयार करण्यासाठी  फर , ऍक्रेलिक कापड  ,कापूस, धागा ,सुई  इत्यादी  साहित्य वापरून  टेडी तयार करण्यात आला.
टेडी संख्या खर्च  विक्री किंमत नफा
20  नग    5000 रु   6000 रु  1000  रु



गृह आरोग्यात प्लास्टिक बंदी ला पर्याय म्हणून कापडी पिशव्या शिवणाऱ्या मुली

गृह आरोग्यात प्लास्टिक बंदी ला पर्याय म्हणून कापडी पिशव्या शिवणाऱ्या मुली

गृह विभागात पेरू जेली तयार करताना

गृह विभागात पेरू जेली तयार करताना


पेरू जेली तयार करणे.     
श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ  या प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पेरू जेली तयार करणे हे प्रॅक्टिकल केले. 
पावसाळ्यात पेरू पटकन खराब होतात  त्यामुळे  पावसाळ्यात पेरूला कमी मागणी असते  म्हणून पेरू स्वस्त होतात 
जेली तयार करून ठेवल्यास उपयोगी ठरते. जेली तयार करण्यासाठी  पेरू साखर लिंबू ( सायट्रिक ऍसिड )दालचिनी वापरून
 जेली तयार होते.

तयार जेली    एकूण खर्च      विक्री किंमत     नफा
250gm           64.80रु        80 रु           13  रु

पाबळ बीटाचे केंद्रप्रमुख व  प्राचार्य यांची  आय. बी .टी. विभागाला सदिच्छा भेट .सोबत समन्वयक ,निदेशक व विद्यार्थी त्यांना माहिती देताना.




Jun   2018                             आय. बी. टी. विषयाचे महत्व व माहिती समजावून सांगताना प्राचार्य, समन्वयक ,निदेशक तसेच ऐकताना मग्न झालेले इयत्ता आठवीचे चारही तुकड्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनी.

अभियांत्रिकी विभागात शेती पशुपालन विभागासाठी फावड्या तयार करताना मुले

अभियांत्रिकी विभागात शेती पशुपालन विभागासाठी फावड्या तयार करताना मुले


                                                                                    अभियांत्रिकी विभागात नववीच्या मुलांनी शेतीतील वाफे  बांधणी करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या 6 फावड्या बनवायचे    ठरवले. मुलांनी प्रथम ड्रॉइंग तयार केले व त्यानुसार मटेरियल खरेदी केले. मटेरियल खरेदी केल्यानंतर हे मटेरियल ड्रॉइंगच्या मापानुसार कटिंग केले व पाईप  माती ओढणाऱ्या पत्र्याला वेल्डिंग केला .फावड्या बनविल्यानंतर रंग देण्या अगोदर त्या फावड्या पाॅलीस पेपर च्यासाह्याने घासून घेतल्या. व रंग देण्यास सुरवात केली. यामध्ये मुलांना रंग काम, वेल्डिंग, कटिंग शिकण्यास मिळाले. काम पूर्ण झाल्यानंतर सहा फावड्याची एकूण मटेरियल खर्च 1336 रुपये  आला. प्रत्येक फावडी 250  रुपये इतकी किमतीने विकल्यास सहा फावड्यांची एकूण किंमत 1500 रुपये व नफा 164 रुपये झाला.
                                                                                         

Saturday 27 October 2018

वेगवेगळ्या गावातील पाणी तपासणी करणे

पाबळ गावातील  पाणी  पिण्यास योग्य आहे की नाही    हे तपासणी करताना I.B.T.  मुले                                                                                                                                                                                                           गृहआरोग्य विभागात लोकउपयोगी सेवेद्वारे  गावातील  पाणी  पिण्यास योग्य आहे की नाही  हे भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ या प्रशालेत इयत्ता  10 वी च्या विद्यार्थ्यांनी H2s  स्टिपचा वापर करून आठ संम्पल तपासणी केली.
     पाबळ गावामध्ये सध्या पाण्याची खुप चणचण भासु लागली आहे. आक्टोबर महिन्यातच दुष्काळ वाटु लागला आहे. जेथे पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणचे पाणी पिण्यासाठी तयारी दाखवून तहान भागवत आहेत .अशातच ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे काय़ असा विचार येताच जाधव कैलास सरांनी सार्वजनिक  विहीर किंवा बोर ज्या पाण्याचा पाणी पिण्यासाठी उपयोग होतो अशा सार्वजनिक ठिकाणचे पाणी तपासणीसाठी H2S  स्टिप उपलब्ध करून दिल्या. मग सार्वजनिक ठिकाणचे पाणी आणायचे नियोजन केले .पाणी टेस्ट का करायचं ते सर्व  मुलांना समजावून सांगितले .सर्व मुलांना सार्वजनिक पिण्याची ठिकाणे दिल्या पमाणे संम्पल आणले .सर्व मुलांना आणले ले सम्पल H2s चा वापर कसा करावा हे समजावून सांगितले .
आठ संम्पल जमा झाली.
.त्या ठिकाणचे तपशील खालील पमाणे
1.चौधरी बेंद बोर -पाणी पिण्यास अयोग्य 
2.चौधरी बेंद सार्वजनिक नळ - पाणी पिण्यास    अयोग्य 
3.पिंपळवाडी बोर- -पाणी पिण्यास अयोग्य 
4.घोडेकर वस्ती विहीर - -पाणी पिण्यास अयोग्य 
5.झोडकवाडी बोर- -पाणी पिण्यास अयोग्य 
6.चौधरी वस्ती पिराचामाळ विहिर - -पाणी पिण्यास अयोग्य 
7.थापेवाडी सार्वजनिक बोर -पाणी पिण्यास योग्य आहे .
8.शाळा फिल्टर पाणी - -पाणी पिण्यास योग्य आहे .
      असा रिजल्ट आल्यावर जे पाणी पिण्यास अयोग्य  आहे त्या पाण्यात मेडिक्लोर टाकले व ते पाणी  पिण्यास योग्य होत होते हे मुलांना समजावून सांगितले .तसेच सार्वजनिक ठिकाणी तसे फलक लावण्याची तयारी करीत आहोत.


Friday 26 October 2018

दसऱ्याच्या निमित्ताने साहित्यांची पूजा करताना विद्यार्थी व शिक्षक

खंडेनवमी च्या  दिवशी  पाबळ विद्यालयाचे  प्राचार्य  श्री धुमाळ सर  यांनी आय बी टी विभागातील  साहित्य साधनांची  पूजा करून  नारळ फोडला .दसरा या सणाच्या निमित्ताने आपण सर्व साधन साहित्यांची साफसफाई करून खंडे नवमीच्या दिवशी  त्यांचे पूजन करतो त्यानिमित्ताने साहित्य साधने एकत्र गोळा करून त्यांची तपासणी ही होते खरात साहित्य बाजूला काढून नवीन साहित्याची खरेदी

करता येते जेणेकरून काम व्यवस्थित होऊ शकते हे विद्यार्थ्यांना या निमित्ताने समजले ..

   

Saturday 20 October 2018

कार्यशाळेच्या पायर्‍यांचे बांधकाम करणे .

इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या कार्यशाळेच्या पायर्‍यांचे

बांधकाम केले . 

  अभियांत्रिकी विभागात नववीच्या मुलांनी बांधकाम या प्रॅक्टिकल साठी शाळेमध्ये आय.टी .आय .या कार्यशाळेच्या पायऱ्यांचे बांधकाम चालू होते .त्या ठिकाणी जाऊन मुलांनी कार्यशाळेच्या पायऱ्या मधील एक पायरी चा भाग निवडला व बांधकामाचे त्या ठिकाणी नियोजन केले .त्यासाठी मुलांनी प्रथम पायऱ्यांचे ड्रॉइंग तयार केले व ड्रॉईंग च्या मापानुसार 6 फुट 8 इंच  x   5 फुट 8 इंच जमिनीवर थोडेफार खोदकाम केले व त्यावर पाणी मारले. जेणेकरून सिमेंट मधील पाणी शोषले जाणार नाही. मग मॉर्टर तयार करून त्याठिकाणी खाली टाकले व लाईन दोरी बांधून घेतली. लाईन दोरी नुसार विटा मांडण्यास सुरुवात केली .यामध्ये मुलांना लाईन दोरी ओळंबा व गुण्या शिकण्यास मिळाले .त्यानंतर यासाठी साधारणपणे मटेरियल खर्च 2834 रुपये , गवंडी  मजुरी 1000 रुपये  व एकूण  3834 रुपये इतका खर्च आला.


    

Thursday 18 October 2018

नानकटाई तयार करणे

नानकटाई तयार करताना मुले

शेती पशुपालन विभागात दशपर्णी अर्क तयार करताना मुले


शेती पशुपालन विभागात दशपर्णी अर्क तयार करताना मुले.

   


 
                                    

अभियांत्रिकी विभागात आय. टी.आय कार्यशाळेचे प्लास्टर करताना नववीच्या मुली

अभियांत्रिकी विभागात आय. टी.आय. कार्यशाळेचे प्लास्टर करताना नववीच्या विद्यार्थिनी .

गणेश उत्सवासाठी चिक्कीची खिरापत तयार करणे

भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ या प्रशालेत विद्यार्थी विकास मंडळा तफें गणेश उत्सव साजरा करण्यात आला होता .या गणेश उत्सवा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची खिरापत देत होते त्या मध्ये  मुरमुरे ,केळी ,भेळ या सारखे पदार्थाचे खिरापत म्हणून वाटप करण्यात येते होते .आपल्या प्रशालेत आ.बी.टी.विभागांतर्गत चिक्की तयार करण्यात येते अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना सांगितले व चिक्की च्या पौष्टिक ते बद्दल माहिती समजावून सांगितले म्हणून आय.बी.टी.च्या विद्यार्थ्यांना 1900 पाकीटे तयार करण्याची आँडर मिळाली .या मध्ये  इयत्ता 10वी च्या  मुले व मुली यांच्या मदतीने  साखर व शेंगदाणे चे25  किलो मटेरियल वापरून 1900 पाकिटे तयार झाली .या प्रकल्पा मध्ये इयत्ता 10वी च्या 26 मुलांनी काम केले .
या प्रकल्पा मध्ये कामाचे प्लॅनिग  करताना काही मुले शेंगदाणे भाजुन देत होते तर काही मुले मिक्सर वर शेंगदाणे चा कुट तयार करत होती तर त्याच वेळेस काही मुले चिक्की साठी पाक तयार करीत होती .काही मुले चिक्की लाटुन पाहिजे त्या आकारात कापुन देत होती .काही मुले पॉकिंग करीत  होती .अशा  प्रकारे सर्व पोसेसिंग साठी चार चार मुंलांचे गट तयार  करण्यात आले होते .
तयार झालेली पाकीटे 1900





ऊर्जा पर्यावरण विभागासाठी सहा टूल बनविणे.

मुलांनी प्रथम ऊर्जा पर्यावरण विभागासाठी जे6 स्टूल बनवायचे आहे. त्याचे सुरुवातीला ड्रॉइंग काढले .व अंदाजपत्रक तयार केले.  अंदाजपत्रकानुसार मटेरियल खरेदी केले .मटेरियल खरेदी केल्यानंतर ड्रॉईंग च्या मापानुसार कट करून घेतले .मग वेल्डिंग करण्यास सुरुवात केली. वेल्डिंग करत असताना ज्या दक्षता आहेत त्या सांगितल्या. उदाहरण पायामध्ये चप्पल किंवा बूट घातले पाहिजेत .हातामध्ये कापडी हॅन्ड ग्लोज घातले पाहिजे. गॉगल किंवा स्क्रीन चा वापर केला पाहिजे.
             त्याचबरोबर सनमाइका व प्लायवूड कट करून घेतले. काही मुलांनी प्लायवुड बसविण्यासाठी अंगला ड्रिल पाडले .रंगकाम केले .टॉप बसविला टूल करताना कामाचा अनुभव आला .पूर्ण झाल्यानंतर त्याची किंमत काढली एकूण सहा स्टूल ची किंमत मजुरीसह 2909 रुपये इतकी आली. विक्री किंमत 3209 रुपये निव्वळ नफा 300रुपये . 




ऊर्जापर्यावरण विभागामध्ये प्रॅक्टिकल साठी वेगवेगळे सर्किट बोर्ड तयार करणे

इयत्ता दहावीच्या मुलींनी प्रकल्पामध्ये कम्युनिटी सर्विस  मध्ये  बोर्ड तयार करायला घेतले. त्याचे ड्रॉइंग तयार केले .ड्रॉइंग नुसार प्लायवुड कट करून घेतले. होल्डर व स्विच च्या मापाची  खा च  पाडल्यानंतर बोर्डला होल्डर व स्वीच बसविले आणि बोर्ड तयार झाल्यावर एकूण 9 बोर्ड ची किंमत काढली.  एकूण किंमत  मजुरीसह  2160 रुपये आली.



रंग काम करणे

शाळेचे गेट नवीन बनवायचे असल्यामुळे हे गेट कॉन्ट्रॅक्टदार आणि घेतले होते. मुलींनी गेटचे वेडिंग चे काम थोड्याफार प्रमाणे मध्ये केले. गेटचे वेल्डिंगचे काम झाल्यानंतर त्यांनी मुलींना रंग देण्यासाठी सांगितले.  रंग देताना दहावीच्या मुलांनी  काळा रंग देण्यासाठी सुरुवात केली .रंग देत असताना ब्रशचा कशा प्रकारे वापर करायचा हे लक्षात आले. रंग कशाप्रकारे घेतला पाहिजे हे मुलांना अनुभवामुळे हळूहळू लक्ष येऊ लागले. त्यामुळे  रंग घेत असताना किती घेतला पाहिजे हे समजले रंग काम करत असताना सुरक्षितता कोणती बाळगली पाहिजे त्यामध्ये कपड्यावर  पडून देऊ नये . काम झाल्यानंतर ब्रश रॉकेलमध्ये बुडवून ठेवावे हे सर्व काम करत असताना गेटला रंग देण्याचा आलेला अंदाजे खर्च मजुरीसह 725 रुपये इतका आला.


                                                                             
        

         

पर्जन्यमापक तयार करणे

पर्जन्यमापक बनविण्याचा उद्देश आपण नियमित बातम्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यात किती पाऊस पडला आहे हे पाहत असतो पण आपल्याला आपण ज्या गावांमध्ये राहतो त्या गावांमध्ये किती पाऊस पडला आहे हेच माहीत नसते त्यामुळे मुलांनी पर्जन्यमापक तयार केले तयार करण्याचे ठरवल्यानंतर मुलांनी त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे डिझाईन सुचवले व त्यातील दोन मॉडेल तयार करणे त्यामध्ये विचार करण्यास शिकले त्यांचा आत्मविश्‍वास वाढला उपकरण तयार करण्यासाठी सर्व साहित्य जमा केले व काम करण्यास सुरुवात केली काम करताना सुरक्षिततेचे नियम लक्षात घेऊन सर्व कामे पूर्ण केली कटिंग करताना गॉगलचा वापर केला वेडिंग करताना स्क्रीनचा वापर केला रंग देताना स्वतःच्या कपड्यांची काळजी घेतली अशी सर्व कामे पूर्ण झाल्यावर पर्जन्यमापक  शाळेच्या इमारतीवर  बसविले गेले साहित्य सर्व जाग्यावरती ठेवून दिले दुसऱ्या दिवशी  पाऊस त्यामध्ये किती पडला गेला हे मोजला एक पर्जन्यमापक तयार करण्यासाठी 76 रुपये खर्च आला अशी आम्ही दोन बनवली त्यासाठी 152 रुपये मजुरी सह खर्च आला



वीट बांधकाम( विटांच्या रचना)

  शाळेमध्ये आयटीआय विभागाचे मोठे बांधकाम चालू होते .त्या बांधकाम मध्ये काही भाग मुलींनी प्रॅक्टिकल साठी निवडला .हा भाग निवडल्यानंतर फाउंडेशन  हे लेवल ट्यूबच्या साह्याने कसे करावयाचे हे मुलींना शिकण्यास मिळाले .त्यानंतर  बांधकाम करत असताना सिमेंट व वाळू यांचे प्रमाण किती घ्यायचे हे मुलींना समजले. त्याचबरोबर विटा एका लाईन मध्ये ठेवत असताना लाईन दोरीचा वापर कशाप्रकारे करायचा हे समजले. कोपऱ्यामध्ये गुण्या चा वापर कशाप्रकारे करायचा हे समजले. ओळंबा कशाप्रकारे वापरायचा हे समजलं .हे बांधकाम करत असताना वेगवेगळे बोंड चे प्रकार आहेत हे सांगण्यात आले.
        बांधकाम करत असताना घ्यावयाच्या दक्षता ह्या मुलींना सांगण्यात आल्या उदाहरणार्थ हातामध्ये रबरी हॅन्ड ग्लोज वापरणे. पायात रबरी बूट घालने. काम झाल्यावर सर्व  साहित्य धुवून  ठेवणे.
        हे काम मोठ्या स्वरूपाचे असल्यामुळे त्याची अंदाजे किंमत मजुरीसह 3500 पर्यंत  आली. हे काम मोठ्या स्वरूपाचे  पाहिल्यानंतर मुलींना कामाचा अनुभव व अंदाज आला.




डेकोरेशन साठी लहान बल्बच्या माळा बनविणे

गणेश उत्सवा निमित्त शाळेत आ बी टी ऊर्जा पर्यावरण विभागांमध्ये डेकोरेशनच्या माळा तयार करण्यास सुरुवात केली
माळा तयार करत असताना मुलांना सोल्डरिंग चा उपयोग कसा करावयाचा हे शिकण्यास मिळाले त्यानुसार एका माळेमध्ये किती बल्ब असणे गरजेचे आहे हे समजले माळ बंद झाले असता ती कशी दुरुस्त करायची हे समजले 
50 बल्ब च्या माळेचा खर्च  760 रुपये मजुरी सह
त्यामुळे तीन डेकोरेशनच्या माळा साठी लागणारा खर्च 2220 रूपये मजुरीसह.