Tuesday 19 November 2019


मिसळ तयार करणे 
आज-काल धावपळीच्या जीवनामुळे नागरिकांकडून फास्टफूड खाण्याचा  जास्तच भर दिसत आहे. नागरिकांना वेळ कमी मिळत असल्यामुळे  हॉटेलमध्ये तयार होणारे पदार्थ खाण्याकडे  जास्तच पसंती दिसत आहे . त्यातीलच एक पदार्थ म्हणजे मिसळ पाव होय  . मिसळ हा खाद्यपदार्थ फार लोकप्रिय म्हणून ओळखला जात आहे . म्हणून मिसळ तयार करण्याचे ठरविले . 
यामध्ये मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो ,लसूण, आले, मीठ  ,मिरची पावडर हळद  जिरी ,मोहरी, तेल, मिसळ मसाला, कोथिंबीर ,कढीपत्ता फरसाण , पाव   हे प्रामुख्याने साहित्य लागते.
वर्गातील मुलांचे दोन गट पाडले. पहिल्या गटातील मुलांनी साहित्याची यादी करून साहित्य आणले. तर दुसर्‍या गटाने किचन व भांड्याची स्वच्छता करून घेतली. पहिल्या गटाने आलेली मटकी निवडून दिली मग कांदा बारीक करून त्याची पेस्ट करून दिली तर टोमॅटो धुऊन बारीक चिरून पेस्ट तयार करून  दिली. कोथिंबीर निवडून बारीक चिरून  ठेवली . दुसऱ्या गटाने कांदा टोमॅटोची पेस्ट वेगळ्या ठिकाणी तेल टाकून चांगले परतून घेतली. एका पातेल्यात फोडणी देण्यासाठी तेल टाकून   मोहरी ,जीरी ,हळदलसूण, कांदा व टोमॅटोची पेस्ट कढीपत्ता ,टाकून मिसळ मसाला मटकी टाकून शिजवून घेतले . त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून मिसळ चांगली उकळी येऊन देईपर्यंत शिजवून घेतली . मग एका प्लेटमध्ये मिसळ व दोन पाव अशा आपले तयार केल्या ही प्लेट 30 रुपये प्रमाणे विकले
12 प्लेट मिसळ पाव  30  रुपये/प्लेट  = 360 रुपये.
विक्री किंमत - एकूण खर्च  नफा
30  रुपये प्लेट * 12 = 360. -  313 = 47
    
महात्मा गांधी जयंती निमित्त  25 स्टुडन्ट स्टडी सोलर लॅम्प बनवले.



 श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ व आय.आय.टी.पवई, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सौरउर्जा कार्यशाळा 2019  महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर 2019 रोजी आयोजित करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे 150 व्या जयंतीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम शंभर देशातील दहा लाखांहून अधिक विद्यार्थी एकाच वेळेस सौरदिवे स्वतः बनविण्याचे प्रशिक्षण घेणार होते. त्याच धर्तीवर आय.आय.टी. पवई, मुंबई 1 लाख 30 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच 857 शाळा यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवणार असे नियोजन होते. या प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती. म्हणून श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ व आयटीआय मधील 125 विद्यार्थ्यांसाठी आम्ही ही कार्यशाळा आयोजित केली पर्यावरणातील बदल अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व तसेच सौर ऊर्जेचे महत्त्व याचे मार्गदर्शन सत्र घेतले सौरदिवा बनवण्याचे घटक उपकरणे तसेच जोडणी यांची ओळख करून दिली सौर दिवा उपकरणाची तांत्रिक माहिती दिली सौर दिव्याची टक्क्याने जोडणी करून घेतली  त्यामध्ये  सोलर प्लेट  कशी जोडावयाची  स्विच कसे बसवायचे  पीसीबी कसा असेंबल करायचा  एलईडी बल्ब सोल्डर कसा करावयाचा बॅटरी कशी कनेक्ट करावयाची व संपूर्ण टेबल लॅम्प कसा जोडा वयाचा हे विद्यार्थी शिकले यासाठी 125 विद्यार्थ्यांचे प्रत्येकी पाच याप्रमाणे 25 गट तयार केले एका गटासाठी एक पाच विद्यार्थ्यांमध्ये  एक लॅम्प  याप्रमाणे  याप्रमाणे 25  स्टुडन्ट स्टडी टेबल लॅम्प  आम्ही बनवले  व ते चेक केले केले पुढील नियोजनात  अजून  शंभर लॅम्प  बनविण्याचे टार्गेट  निश्चित केले आहे यासाठी  विद्यार्थ्यांकडून  250 रुपये व संस्थेकडून 250 रुपये असा पाचशे रुपये प्रत्येक लेनचा  खर्च येईल असे गृहीत धरले  25 या कार्यशाळेमध्ये  पर्यावरणाचा रास न करण्याची  125 विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली 

शाळेमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅमला आधार स्टॅन्ड बनवणे.
आय.बी.टी. अभियांत्रिकी विभागात मुलांनी बांधकामामध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी वर चढून जाण्यासाठी जो रॅम बनवला आहे. त्या रॅमच्या बाजूला आधारासाठी स्टॅन्ड हे इयत्ता नववीच्या मुलांनी करण्यास हाती घेतले. रॅम आधार स्टॅन्ड बनवण्यासाठी काही जुने मटेरियल गोळा करून त्यालाच वेल्डिंग करून बनवले . बांधकामाच्या फाउंडेशन मध्ये ते बसवले. खूप गडबड असल्यामुळे त्याला रंग देता आला नाही परीक्षाही असल्यामुळे नंतर रंग द्यावयाचा असे ठरवले
त्यामध्ये मुलांना वेल्डिंग करणे, मोजमाप घेणे, अशा प्रकारचे कौशल्य प्राप्त झाले. यासाठी मटेरियल खर्च 900 रुपये,  मजुरी 270 रुपये,   एकूण खर्च 1170 रुपये आला.   
आय.बी.टी. अभियांत्रिकी विभागात मुलांनी बांधकामामध्ये
अपंग विद्यार्थ्यांसाठी वर चढून जाण्यासाठी जो रॅम बनवला आहे. त्या रॅमच्या बाजूला आधारासाठी स्टॅन्ड हे इयत्ता नववीच्या मुलांनी करण्यास हाती घेतले. रॅम आधार स्टॅन्ड बनवण्यासाठी काही जुने मटेरियल गोळा करून त्यालाच वेल्डिंग करून बनवले . बांधकामाच्या फाउंडेशन मध्ये ते बसवले. खूप गडबड असल्यामुळे त्याला रंग देता आला नाही परीक्षाही असल्यामुळे नंतर रंग द्यावयाचा असे ठरवले
त्यामध्ये मुलांना वेल्डिंग करणे, मोजमाप घेणे, अशा प्रकारचे कौशल्य प्राप्त झाले. यासाठी मटेरियल खर्च 900 रुपये,  मजुरी 270 रुपये,   एकूण खर्च 1170 रुपये आला.   

Oct - 2019
अपंग विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी आय.बी.टी विद्यार्थ्यानी बनविला बांधकामामध्ये रॅम बनविणे.




 शाळेमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी वर चढून जाण्यासाठी रॅम असणे गरजेचे होते. विधानसभा  निवडणूक  पुढच्या आठवड्यात असल्यामुळे युद्धपातळीवर आय.बी.टी. अभियांत्रिकी विभागात इयत्ता आठवी च्या मुलांनी  बांधकामांमध्ये रॅम बनविणे हा प्रकल्प हाती घेतला. ज्या ठिकाणी पायऱ्या आहे अशा ठिकाणी जागा निवडली.  इयत्ता आठवी च्या मुलांनी  त्यासाठी आवश्यक  असणारे साहित्य व मटेरियल गोळा केले . प्रत्यक्ष बांधकाम करण्यास  सुरुवात केली . यामध्ये मुलांना ओळंबा ,गुण्या, वीट बांधकाम ,लाईन दोरी यांचा वापर कसा करावयाचा हे समजले. काँक्रीट  व मॉर्टर  कसे  तयार करावयाचे हे शिकले . यासाठी मटेरियल खर्च 900रुपये, मजुरी 500 रुपये ,एकूण खर्च 1400 रुपये आला.