Wednesday 28 November 2018

उर्जा पर्यावरण विभागात  मिक्‍सर दुरुस्त करताना मुली

उर्जा पर्यावरण विभागात  मिक्‍सर दुरुस्त करताना मुली 




विषय  - मिक्सर व मिक्सर ची भांडी दुरुस्ती करणे .
 ऊर्जा पर्यावरण विभागात विद्युत उपकरणे दुरुस्ती शिकताना इयत्ता दहावी च्या विद्यार्थिनीसाठी मिक्सर व मिक्सर ची भांडी दुरुस्ती हा प्रकल्प घेतला .मुलींच्या दृष्टीने  दैनंदिन जीवनात अत्यंत उपयोगी प्रकल्प आहे असे मुलींना वाटले. मिक्सर दुरुस्ती साठी शाळेतील शिक्षिका सौ. झोडगे मॅडम यांनी आणला होता .त्याचबरोबर तीन भांडी दुरुस्तीसाठी आणली होती. हा मिक्सर टेस्ट लॅम्प ने चेक केल्यावर वाइंडिंग खराब झाले हे समजले .त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या मटेरियल ची माहिती घेऊन यादी तयार केली. मिक्सरची वायरिंग व मोटर ची माहिती घेऊन मिक्सर खोलून दुरुस्ती नंतर पुन्हा जोडणी करून मिक्सर चालू केला .तसेच भांडी ही खोलली बुश, कपलर् शाफ्ट, ब्लेड इत्यादींची दुरुस्ती केली .हे काम करताना टेस्ट लॅम्प चा वापर , फील्ड वाइंडिंग,  आर्मिचर वाइंडिंग ,कार्बन ब्रश यांचे ज्ञान मिळाले. मिक्सर खोलने पुन्हा संपूर्ण जोडणी करणे यांचे ज्ञान मिळाले. मिक्सर दुरुस्ती व भांडी  दुरुस्ती यासाठी मटेरियल  खर्च  440  रुपये आला . लोकोपयोगी सेवा म्हणून 520 रुपये मिळाले .

No comments:

Post a Comment