Tuesday 19 November 2019


मिसळ तयार करणे 
आज-काल धावपळीच्या जीवनामुळे नागरिकांकडून फास्टफूड खाण्याचा  जास्तच भर दिसत आहे. नागरिकांना वेळ कमी मिळत असल्यामुळे  हॉटेलमध्ये तयार होणारे पदार्थ खाण्याकडे  जास्तच पसंती दिसत आहे . त्यातीलच एक पदार्थ म्हणजे मिसळ पाव होय  . मिसळ हा खाद्यपदार्थ फार लोकप्रिय म्हणून ओळखला जात आहे . म्हणून मिसळ तयार करण्याचे ठरविले . 
यामध्ये मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो ,लसूण, आले, मीठ  ,मिरची पावडर हळद  जिरी ,मोहरी, तेल, मिसळ मसाला, कोथिंबीर ,कढीपत्ता फरसाण , पाव   हे प्रामुख्याने साहित्य लागते.
वर्गातील मुलांचे दोन गट पाडले. पहिल्या गटातील मुलांनी साहित्याची यादी करून साहित्य आणले. तर दुसर्‍या गटाने किचन व भांड्याची स्वच्छता करून घेतली. पहिल्या गटाने आलेली मटकी निवडून दिली मग कांदा बारीक करून त्याची पेस्ट करून दिली तर टोमॅटो धुऊन बारीक चिरून पेस्ट तयार करून  दिली. कोथिंबीर निवडून बारीक चिरून  ठेवली . दुसऱ्या गटाने कांदा टोमॅटोची पेस्ट वेगळ्या ठिकाणी तेल टाकून चांगले परतून घेतली. एका पातेल्यात फोडणी देण्यासाठी तेल टाकून   मोहरी ,जीरी ,हळदलसूण, कांदा व टोमॅटोची पेस्ट कढीपत्ता ,टाकून मिसळ मसाला मटकी टाकून शिजवून घेतले . त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून मिसळ चांगली उकळी येऊन देईपर्यंत शिजवून घेतली . मग एका प्लेटमध्ये मिसळ व दोन पाव अशा आपले तयार केल्या ही प्लेट 30 रुपये प्रमाणे विकले
12 प्लेट मिसळ पाव  30  रुपये/प्लेट  = 360 रुपये.
विक्री किंमत - एकूण खर्च  नफा
30  रुपये प्लेट * 12 = 360. -  313 = 47
    

No comments:

Post a Comment