Thursday 18 October 2018

वीट बांधकाम( विटांच्या रचना)

  शाळेमध्ये आयटीआय विभागाचे मोठे बांधकाम चालू होते .त्या बांधकाम मध्ये काही भाग मुलींनी प्रॅक्टिकल साठी निवडला .हा भाग निवडल्यानंतर फाउंडेशन  हे लेवल ट्यूबच्या साह्याने कसे करावयाचे हे मुलींना शिकण्यास मिळाले .त्यानंतर  बांधकाम करत असताना सिमेंट व वाळू यांचे प्रमाण किती घ्यायचे हे मुलींना समजले. त्याचबरोबर विटा एका लाईन मध्ये ठेवत असताना लाईन दोरीचा वापर कशाप्रकारे करायचा हे समजले. कोपऱ्यामध्ये गुण्या चा वापर कशाप्रकारे करायचा हे समजले. ओळंबा कशाप्रकारे वापरायचा हे समजलं .हे बांधकाम करत असताना वेगवेगळे बोंड चे प्रकार आहेत हे सांगण्यात आले.
        बांधकाम करत असताना घ्यावयाच्या दक्षता ह्या मुलींना सांगण्यात आल्या उदाहरणार्थ हातामध्ये रबरी हॅन्ड ग्लोज वापरणे. पायात रबरी बूट घालने. काम झाल्यावर सर्व  साहित्य धुवून  ठेवणे.
        हे काम मोठ्या स्वरूपाचे असल्यामुळे त्याची अंदाजे किंमत मजुरीसह 3500 पर्यंत  आली. हे काम मोठ्या स्वरूपाचे  पाहिल्यानंतर मुलींना कामाचा अनुभव व अंदाज आला.




No comments:

Post a Comment