Saturday 27 October 2018

वेगवेगळ्या गावातील पाणी तपासणी करणे

पाबळ गावातील  पाणी  पिण्यास योग्य आहे की नाही    हे तपासणी करताना I.B.T.  मुले                                                                                                                                                                                                           गृहआरोग्य विभागात लोकउपयोगी सेवेद्वारे  गावातील  पाणी  पिण्यास योग्य आहे की नाही  हे भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ या प्रशालेत इयत्ता  10 वी च्या विद्यार्थ्यांनी H2s  स्टिपचा वापर करून आठ संम्पल तपासणी केली.
     पाबळ गावामध्ये सध्या पाण्याची खुप चणचण भासु लागली आहे. आक्टोबर महिन्यातच दुष्काळ वाटु लागला आहे. जेथे पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणचे पाणी पिण्यासाठी तयारी दाखवून तहान भागवत आहेत .अशातच ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे काय़ असा विचार येताच जाधव कैलास सरांनी सार्वजनिक  विहीर किंवा बोर ज्या पाण्याचा पाणी पिण्यासाठी उपयोग होतो अशा सार्वजनिक ठिकाणचे पाणी तपासणीसाठी H2S  स्टिप उपलब्ध करून दिल्या. मग सार्वजनिक ठिकाणचे पाणी आणायचे नियोजन केले .पाणी टेस्ट का करायचं ते सर्व  मुलांना समजावून सांगितले .सर्व मुलांना सार्वजनिक पिण्याची ठिकाणे दिल्या पमाणे संम्पल आणले .सर्व मुलांना आणले ले सम्पल H2s चा वापर कसा करावा हे समजावून सांगितले .
आठ संम्पल जमा झाली.
.त्या ठिकाणचे तपशील खालील पमाणे
1.चौधरी बेंद बोर -पाणी पिण्यास अयोग्य 
2.चौधरी बेंद सार्वजनिक नळ - पाणी पिण्यास    अयोग्य 
3.पिंपळवाडी बोर- -पाणी पिण्यास अयोग्य 
4.घोडेकर वस्ती विहीर - -पाणी पिण्यास अयोग्य 
5.झोडकवाडी बोर- -पाणी पिण्यास अयोग्य 
6.चौधरी वस्ती पिराचामाळ विहिर - -पाणी पिण्यास अयोग्य 
7.थापेवाडी सार्वजनिक बोर -पाणी पिण्यास योग्य आहे .
8.शाळा फिल्टर पाणी - -पाणी पिण्यास योग्य आहे .
      असा रिजल्ट आल्यावर जे पाणी पिण्यास अयोग्य  आहे त्या पाण्यात मेडिक्लोर टाकले व ते पाणी  पिण्यास योग्य होत होते हे मुलांना समजावून सांगितले .तसेच सार्वजनिक ठिकाणी तसे फलक लावण्याची तयारी करीत आहोत.


No comments:

Post a Comment