Thursday 18 October 2018

गणेश उत्सवासाठी चिक्कीची खिरापत तयार करणे

भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ या प्रशालेत विद्यार्थी विकास मंडळा तफें गणेश उत्सव साजरा करण्यात आला होता .या गणेश उत्सवा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची खिरापत देत होते त्या मध्ये  मुरमुरे ,केळी ,भेळ या सारखे पदार्थाचे खिरापत म्हणून वाटप करण्यात येते होते .आपल्या प्रशालेत आ.बी.टी.विभागांतर्गत चिक्की तयार करण्यात येते अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना सांगितले व चिक्की च्या पौष्टिक ते बद्दल माहिती समजावून सांगितले म्हणून आय.बी.टी.च्या विद्यार्थ्यांना 1900 पाकीटे तयार करण्याची आँडर मिळाली .या मध्ये  इयत्ता 10वी च्या  मुले व मुली यांच्या मदतीने  साखर व शेंगदाणे चे25  किलो मटेरियल वापरून 1900 पाकिटे तयार झाली .या प्रकल्पा मध्ये इयत्ता 10वी च्या 26 मुलांनी काम केले .
या प्रकल्पा मध्ये कामाचे प्लॅनिग  करताना काही मुले शेंगदाणे भाजुन देत होते तर काही मुले मिक्सर वर शेंगदाणे चा कुट तयार करत होती तर त्याच वेळेस काही मुले चिक्की साठी पाक तयार करीत होती .काही मुले चिक्की लाटुन पाहिजे त्या आकारात कापुन देत होती .काही मुले पॉकिंग करीत  होती .अशा  प्रकारे सर्व पोसेसिंग साठी चार चार मुंलांचे गट तयार  करण्यात आले होते .
तयार झालेली पाकीटे 1900





No comments:

Post a Comment