Saturday 20 October 2018

कार्यशाळेच्या पायर्‍यांचे बांधकाम करणे .

इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या कार्यशाळेच्या पायर्‍यांचे

बांधकाम केले . 

  अभियांत्रिकी विभागात नववीच्या मुलांनी बांधकाम या प्रॅक्टिकल साठी शाळेमध्ये आय.टी .आय .या कार्यशाळेच्या पायऱ्यांचे बांधकाम चालू होते .त्या ठिकाणी जाऊन मुलांनी कार्यशाळेच्या पायऱ्या मधील एक पायरी चा भाग निवडला व बांधकामाचे त्या ठिकाणी नियोजन केले .त्यासाठी मुलांनी प्रथम पायऱ्यांचे ड्रॉइंग तयार केले व ड्रॉईंग च्या मापानुसार 6 फुट 8 इंच  x   5 फुट 8 इंच जमिनीवर थोडेफार खोदकाम केले व त्यावर पाणी मारले. जेणेकरून सिमेंट मधील पाणी शोषले जाणार नाही. मग मॉर्टर तयार करून त्याठिकाणी खाली टाकले व लाईन दोरी बांधून घेतली. लाईन दोरी नुसार विटा मांडण्यास सुरुवात केली .यामध्ये मुलांना लाईन दोरी ओळंबा व गुण्या शिकण्यास मिळाले .त्यानंतर यासाठी साधारणपणे मटेरियल खर्च 2834 रुपये , गवंडी  मजुरी 1000 रुपये  व एकूण  3834 रुपये इतका खर्च आला.


    

No comments:

Post a Comment