Thursday 18 October 2018

पर्जन्यमापक तयार करणे

पर्जन्यमापक बनविण्याचा उद्देश आपण नियमित बातम्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यात किती पाऊस पडला आहे हे पाहत असतो पण आपल्याला आपण ज्या गावांमध्ये राहतो त्या गावांमध्ये किती पाऊस पडला आहे हेच माहीत नसते त्यामुळे मुलांनी पर्जन्यमापक तयार केले तयार करण्याचे ठरवल्यानंतर मुलांनी त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे डिझाईन सुचवले व त्यातील दोन मॉडेल तयार करणे त्यामध्ये विचार करण्यास शिकले त्यांचा आत्मविश्‍वास वाढला उपकरण तयार करण्यासाठी सर्व साहित्य जमा केले व काम करण्यास सुरुवात केली काम करताना सुरक्षिततेचे नियम लक्षात घेऊन सर्व कामे पूर्ण केली कटिंग करताना गॉगलचा वापर केला वेडिंग करताना स्क्रीनचा वापर केला रंग देताना स्वतःच्या कपड्यांची काळजी घेतली अशी सर्व कामे पूर्ण झाल्यावर पर्जन्यमापक  शाळेच्या इमारतीवर  बसविले गेले साहित्य सर्व जाग्यावरती ठेवून दिले दुसऱ्या दिवशी  पाऊस त्यामध्ये किती पडला गेला हे मोजला एक पर्जन्यमापक तयार करण्यासाठी 76 रुपये खर्च आला अशी आम्ही दोन बनवली त्यासाठी 152 रुपये मजुरी सह खर्च आला



No comments:

Post a Comment