सध्या चटपटीत खाण्याकडे सर्वांचाच कल जास्त वाढत आहे परंतु या चटपटीत खाण्यामुळे आरोग्य वरती होणारे दुष्परिणाम याकडे कोणाचेच लक्ष नाही . उघड्यावरील पदार्थ खाणे किती हानिकारक आहे हेही सध्या कोणाला समजत सुद्धा नाही . खरंच सर्वजण म्हणतात तेच बरोबर आहे आता सध्या फास्ट फूडचा जमाना आहे. या धावपळीच्या जमान्यात लोकांचा सर्व कल फास्टफूड खाण्याकडेच वळला आहे . पालकां बरोबर मुलांनाही फास्टफूड खाण्यास मिळत आहे. असे बाहेरचे उघड्या वरील पदार्थ स्वच्छतेबरोबरच आरोग्यदायक असतीलच असे नाही. आपण घरी केलेले पदार्थ स्वच्छ व आरोग्याचा विचार करूनच करत असतो . असे पदार्थ मुलांना तयार करता आले तर मुलेही घरी ही पदार्थ तयार करू शकतील . म्हणून शाळेतील मुलांना पण असे पदार्थ खाण्याबरोबरच प्रॅक्टिकल मध्ये तयार करण्यास शिकावे असे वाटते म्हणून अन्न पदार्थ टिकवण्याच्या विविध पद्धती या प्रॅक्टिकल अंतर्गत वडापाव तयार करणे हे प्रॅक्टिकल घेण्याचे ठरविले.
अपेक्षित कौशल्य :-- 1.बटाटे पाण्यात उकडणे
2.वडा बेसन पिठात बुडवून तेलात सोडणे हे कौशल्य प्राप्त झाले .3.वडापाव तळण्याचे कौशल्य प्राप्त झाले.
एकूण खर्च 290
एकूण जमा 340.00(34 वडापाव * 10≠= 340)
एकूण नफा 50.00


No comments:
Post a Comment