Thursday 2 April 2020

ओली भेळ तयार करणे




आताच्या धकाधकीच्या काळामध्ये  लोकांचा कमी वेळात  झटपट तयार  होणारे अन्नपदार्थ खाण्याकडे जास्त कल आहे.
असा पदार्थ कोणता तर सहाजिकच सगळ्यांच्या तोंडून एकच उत्तर येतं ती म्हणजे ओली भेळ .
म्हणून मोड आलेली मटकी  टाकलेली  पौष्टिक
ओली भेळ हा खाद्यपदार्थ फार लोकप्रिय म्हणून ओळखला जात आहे . म्हणून   ओली भेळ करण्याचे ठरविले . 
यामध्ये मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो ,लसूण, मीठ  ,मिरची पावडर , हळद  जिरी ,मोहरी, तेल, कोथिंबीर ,कढीपत्ता , फरसाण ,  मुरमुरे  , चिंचेचे आंबटगोड पाणी हे प्रामुख्याने साहित्य लागते.
वर्गातील मुलांचे दोन गट पाडले. पहिल्या गटातील मुलांनी साहित्याची यादी करून साहित्य आणले. तर दुसर्‍या गटाने किचन व भांड्याची स्वच्छता करून घेतली. पहिल्या गटाने आलेली मटकी निवडून दिली मग कांदा ,टोमॅटो बारीक  चिरून  घेतला . कोथिंबीर निवडून बारीक चिरून  ठेवली . दुसऱ्या गटाने  एका पातेल्यात फोडणी देण्यासाठी तेल टाकून   मोहरी ,जीरी ,हळद, लसूण, कांदा  , कढीपत्ता ,टाकून  हिरवी मिरचीची पेस्ट  टाकून मटकी चांगली  शिजवून घेतली .  मुरमुरे चांगले निवडून घेऊन त्यामध्ये हळद ,मिरची पावडर , मीठ टाकून  ते मुरमुरे पिवळे करून घेतले . चिंचेचे गोड आंबट पाणी  तयार करून घेतले . हे सर्व साहित्य तयार झाल्यानंतर  डिश भरण्यास सुरुवात केली . प्रत्येक डिशमध्ये मुरमुरे , चिरलेला कांदा-टोमॅटो , कोथिंबीर  मटकी टाकून मिक्स करून घेतले . त्यावर चिंचेचे गोड आंबट पाणी टाकून  ओली भेळ तयार  केली . या ओळीचा प्लेट भरून विक्री केली .
विक्री किंमत - एकूण खर्च  नफा 23  रुपये प्लेट * 10 = 230. -  212 = 18

No comments:

Post a Comment