Thursday 2 April 2020

कच्ची दाबेली तयार करणे



आताच्या  काळामध्ये  बऱ्याच लोकांना तेलकट  खाण्यावर डॉक्‍टरांनी बंदी घातली आहे आणि बऱ्याच  लोकसंख्येमध्ये वजन वाढ जास्त दिसून येत असल्यामुळे तेलकट पदार्थ खाण्यास नकार येत आहे   त्यामुळे कमी वेळात  झटपट तयार  होणारे अन्नपदार्थआणि पौष्टिक खाण्याकडे जास्त कल आहे.
            कच्ची दाबेली  हा खाद्यपदार्थ  पौष्टिक   म्हणून बरेच जण खातात  बऱ्याच जणांचा कच्ची दाबेली पदार्थ खाण्याकडे कल दिसून येत आहे .यामध्ये डाळिंब ,बटाटा, कांदा, लिंबू ,बडीशेप, शेंगदाणे ,गरम मसाला , लसुन, लाल मिरची पावडर , कोथिंबीर ,कढीपत्ता, तेल,पाव,गावरान तूप  किंवा बटर असले तरी चालते, हळद, जिरी, मोरी ,ओवा, मीठ  इत्यादी .
डाळिंब फोडून त्याचे दाणे तयार केले . बटाटे उकडून सोलून घेतले . शेंगदाणे भाजून त्याच्यावरील टाकले काढून शेंगदाणे अर्धे-अर्धे करून घेतले . कांदा एकदम बारीक चिरून घेतला . लसूण सोलून घेतला त्यामध्ये लाल मिरची पावडर व एक लिंबू पिळून टाकले व त्याची चटणी तयार करून घेतली . चिरलेला बारीक कांदा कढईमध्ये घेऊन थोडे बटर टाकून तो कांदा लाल करून घेणे
. जिरे ,मोहरी ,कढीपत्ता ,हळद , बडीशेप , मिरची पावडर ,गरम मसाला टाकून  थोडे पाणी टाकून तो कांदा शिजवून घेतला . यामध्ये उकडलेला बटाटा बारीक करून टाकला . सर्व मिश्रण एकजीव केले. एका ताटामध्ये काढून घेतले त्या वरती डाळिंबाचे दाणे आणि  शेंगदाणे टाकून  सजवून घेतले . आता एका पावाचे दोन भाग करून त्यामध्ये हा मसाला भरून  पाव बंद करून  तव्या मध्ये बटर टाकून पाव दोन्ही बाजूने  गरम करून घेतला.अशाप्रकारे कच्ची दाबेली तयार झाली.

विक्री किंमत - एकूण खर्च  नफा
40 रुपये प्लेट * 10 = 400. -  351= 49


No comments:

Post a Comment